कारंजा : महाराष्ट्र गवळी समाज संघटना र.न.५४९ वाशिम जिल्हा तर्फे नुकताच महाराष्ट्र गवळी समाजाचे मार्गदर्शक व समाजभूषण पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य गरीब महिलांना साळी-चोळी तसेच गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहित्याचे वितरण करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे विदर्भ प्रसिद्धि प्रमुख प्रा. सी.पी.शेकुवाले, वाशिम जिल्हा माजी अध्यक्ष रहेमान नंदावाले, ऍड़. सुभान खेतिवाले,कय्यूम जट्टावाले,जिल्हा सचिव सुभान चौधरी,जिल्हा कोषाध्यक्ष वकील गारवे,जिल्हा संघटक मोहम्मद मुन्नीवाले,पूर्व जिल्हा उपाध्यक्ष चाँद मुन्नीवाले,प्रा. बदरूद्दीन कामनवाले,यूसुफ सर खेतिवाले, सलीम शेकुवाले, इमाम भवानीवाले,सलीम मुन्नीवाले सह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. असे वृत्त गवळी समाज संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख प्रा सि पि शेकुवाले यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे .