कारंजा : कारंजा येथील हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेले संजय मधुकरराव कडोळे, हे कोणतेही राजकारण न करता, निष्पक्ष व निःस्वार्थपणे समाजकार्य करीत असतात. माझे जुने कार्यकर्तेच नव्हे तर माझे निकटवर्ती म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे, अमरावती विभागीय विधान सभेचे शिक्षक (अपक्ष) आमदार एड. किरणराव सरनाईक यांनी सांगतिले. बंजारा समाजाचे प्रा . विलासराव राठोड सर यांचे घरी, चर्चा करीत असतांना त्यांनी सांगितले, मी संजय कडोळे यांना गेल्या चाळीस वर्षापासून ओळखतो. माणसाशी माणसाने नि:स्वार्थपणे वागावे. मानवसेवा परमो धर्मः हे त्यांचे ब्रिद वाखाखण्यासारखे आहे. आज असे निःस्वार्थ व्यक्ती समाजात आहेत म्हणून समाज व्यवस्थेत मानवता टिकून असल्याचेही यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदिप वानखडे, जि प माजी समाज कल्याण सभापती जयकिसन राठोड, प्रा विलास राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाचे माजी संचालक अशोक पाटील वानखडे, किनखेडचे (धाकली) सरपंच संजय राठोड, दादारावजी देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून,कारंजा येथे केवळ आपल्या मित्रमंडळींच्या भेटीकरिता एड किरणराव सरनाईक हे कारंजा येथे आले होते. ह्यातच त्यांचे मित्रप्रेम सामावले असल्याचे यावेळी संजय कडोळे यांनी सांगितले.