कारंजा :- दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी शेवती येथे पडझड झालेल्या घरांची व शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. येथे भेट देण्यापूर्वी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्यासी त्यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करून पिक स्थितीची माहिती घेतली व उचित कार्यवाहीची मागणी केली असता या ठिकाणी त्वरित प्रशासकीय यंत्रणा पोहचली.दुपारी शेवती येथे प्रत्यक्ष भेट देवून पुन्हा पिक नुकसान व घरांची पडझड ईतर नुकसानीची माहिती दिली.भाजपा जिल्हा अध्यक्ष शामभाऊ बढे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल कृष्णराव कानकिरड, भाजपा जिल्हा सर चिटणीस नागेश घोपे , पंचायत समिति सदस्य दिनेश वाडेकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने , भाजपा तालुका उपाध्यक्ष संकेत नाखले आदी मंडळी उपस्थित होती.तालुक्यात शेवती, मांडवा, वाई व ईतर अन्य गावात वादळी वारा पाऊस गारपीट इत्यादी ठिकाणी शेतातील गहू, हरभरा, संत्रा इत्यादी पिकांचे नुकसान झाले तसेच शेवती येथे घरांची पडझड झाली .मधुकर श्रीराम गांजरे, यांच्या घरास भेट दिली ,घरावर झाड पडल्याने घर पडले आहे . गावातील बहुतांशी घराची छपरे, उडाली, टिन पत्रे उडालीत, घरांच्या भिंती पडल्यात.येथे झालेल्या वादळी वार, गारपीट, पाऊस चक्री वादळ मुळे हरबरा गहू कांदा पिकाचे नुकसान झाले,फळबागांचे नुकसान झाले.सरपंचं मंगेश सावके,गणेश माणिकराव गांजरे ,गजानन महाराज, राहुल देवळे, राजु गांजरे,अशोक गांजरे, , नंदू देवळे , गजानन ढोरे, सुनील गांजरे सह गावातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.