नागभिड-- नाग भिड येथील विद्युत वितरण कार्यालयात रस्ता बांधकाम करताना ठेकेदाराने मुरूम ऐवजी माती टाकून बांधकाम केले याकडे स्थानिक अभियंता यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे नाग भिड येथील कार्यालय व पॉवर स्टेशन एकाचं ठिकांनी असल्याने अनेक कर्मचारी व ग्राहक येत असतात.अश्यातच विद्युत वितरण कंपनीचे पाॅवर स्टेशन असल्याने अनेक तारांची जोडणी आहे.ठेकेदाराने कार्यालय व पॉवर स्टेशन असल्याने काम जर्जेदार असणे गरजेचे होते मात्र कार्यालयासमोर असे काम होत असेल तर आंधळा दडतो आणी कुत्रा पीठ खातो अशी व्यवस्था झाली आहे .ठेकेदार व अधिकारी यांच्या आशीर्वादाने हे चालले आहे. कामे करा.देयके घ्या. तुम्ही सुखी आम्ही सुखी .जनतेच्या पैशाचा चुराडा असे चित्र दिसून येत आहे.याकडे कोण लक्ष देणार. असे जनसामान्यांना वाटत आहे.