वरोरा, (ता.प्र.). वरोरा तालुक्यातील सहा किमी अंतरावर असलेल्या चरुर खटी या गावी जाण्यासाठी रोडवर पाटीवर उतरावे लागते. या पाटीपासून गावात जाण्यासाठी गावातील अनेक लोक, शाळकरी मुले, म्हातारे नागरिक यांना या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. चरूर खटीला जाणाऱ्या रस्त्याची खूप दुरवस्था झाल्याने नागरिकांनाया रस्त्यांनी दुचाकीने, चार चाकीने , पायदळ जाताना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या गावाकडे आमदार, खासदार लोकप्रतिनिधींनीहीं याकडे दुर्लक्ष केल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. मुख्य म्हणजे या गावात वेकोलिने सीएसआर फंडातून हा रस्ता त्वरित बनवावा अशी आशाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावातील अनेक घरांना ब्लास्टिंगमुळे भेगा पडल्या असून याची नुकसानभरपाई वेकोलिद्वारे त्वरित देण्यात यावी अशी मागणी ही आता नागरिक करीत आहे. या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास उपोषण करण्यात येईल असे गावातील उपसरपंच विवेक नांदे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.