वाशिम : जिल्हा रुग्णालय वाशिम व त्याअंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालये तसेच जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रिक्त असलेल्या वैद्यकिय अधिकारी गट-अ पदाची कंत्राटी स्वरुपात पदभरती करण्यात येणार आहे. त्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.त्याकरीता एम.बी.बी.एस. पदव्युत्तर पदविका / पदवीधारक यांनी अर्ज करावेत.जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता एम.बी.बी.एस उमेदवार उपलब्ध न झाल्यास बी.ए.एम.एस. उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल, तसेच विशेषतज्ञास विशेष प्राधान्य देण्यात येईल.त्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवार यांनी 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रासह अर्ज सादर करावे.
या पदभरतीकरीता 25 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे.
या दिवशी मुलाखती दरम्यान उमेदवार उपलब्ध न झाल्यास वैद्यकिय अधिकारी यांची पदे तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्याकरीता महिन्याच्या पहिल्या व तिस-या मंगळवारी मुलाखत घेण्यात येईल.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनील कावरखे यांनी कळविले