अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे १२ जून २०२२ रोजी, रविवारी सायं ६ वा.खुले नाट्यगृह येथे स्वरसंध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.सदर कार्यक्रमात गणितात 7 विश्वविक्रम करणारा व बालश्री पुरस्कार प्राप्त प्रणित कुमार गुप्ता गणिताचे प्रात्यक्षिक अवघ्या तीन सेकंदात सोडवून दाखवणार आहे.या कार्यक्रमात नागपूर येथील अंध कलावंत धनुष कुमार,अकोल्यातील ७ वर्षांची बाल कलावंत मंजीरी पांडे व नितीन खंडारे यांचे संगीत प्रदर्शन रसिकांना अनुभवता येणार आहे.या कार्यक्रमात व्हिल चेअर ,कर्ण यंत्र, व्हाईट केन व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.दिव्यांगांची नोंदणी व *प्रवेशिका मिळवण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाईन 9423650090क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान प्रा.विशाल कोरडे, अनामिका देशपांडे, आनंद अग्रवाल, सिद्धार्थ रुहाटिया,राम पाटील, डॉ.सतिश उटांगळे, रितेश मिरझापूरे,भाग्यश्री देशमुख, मिनाक्षी फिरके,सचिन बुरघाटे, हर्षवर्धन मानकर,पवनकुमार कछोट व कल्पना देशमुख यांनी केले आहे.