बालपणापासून स्वच्छता व आरोग्याबाबत जागरूक असणारे निसर्गोपचार तज्ञ डॉ.इम्तियाज लुलानिया यांनी नेहमीच, आपल्या समाजकार्या करीता आदर्श म्हणून कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना आदर्श मानून, त्यांची दशसुत्री खऱ्या अर्थाने अंगीकारत दशसुत्री प्रमाणे,आपल्या सभोवताली राहणार्या समाजाला निसर्गोपचाराविषयी जागरूक करतांना स्वच्छतेचा मूलमंत्र दिलेला असून, तळागाळातील गरजू,अंध,अस्थिव्यंग,आजारी आणि गोरगरिबांना मदतीचा हाथ दिलेला आहे.तसेच सामाजिक कार्य करीत असतांना त्यांनी त्यांचे मामाजी आय. के. परमार तथा जिवलग मित्र रोमिल अरविंद लाठीया यांच्या सहकार्याने, "जय हो स्वच्छ भारत अभियान" लघु चित्रपट निर्मिती करून, या चित्रपटाद्वारे सुद्धा संत गाडगे बाबांचा स्वच्छतेचा संदेश देत समाजप्रबोधन केलेले आहे. (त्यांच्या जय हो स्वच्छ भारत अभियान या लघुचित्रपटाला सुद्धा यापूर्वी राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.) तसेच त्यांचा पारंपारिक जडीबुटी औषध व्यवसाय असून कोरोना महामारी काळात त्यांनी स्वतः आयुर्वेदिक काढा तयार करून, हजारो रुग्नांवर मोफत उपचार केले होते.त्यामुळे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन नागपूरच्या, केन्द्रशासन तथा राज्य शासन मान्यता प्राप्त, मदत सामाजिक संस्थेने त्यांना सन २०२२ चा, राज्यस्तरिय संत गाडगे बाबा स्वच्छता दूत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, सदर्हु राज्यस्तरिय पुरस्काराचे वितरण नुकतेच नागपूर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीष पांडव, प्रमुख अतिथी आ.अभिजीत वंजारी, लॉन्गमार्च प्रणेते प्रा. जोगेन्द्र कवाडे (सर), नाळ चित्रपटाच्या अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, विशेष अतिथी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही अपरिहार्य कारणाने ते प्रत्यक्ष पुरस्काराला हजर न राहू शकल्याने संस्थेतर्फे त्यांना घरपोच पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे, अभा नाट्य परिषदेचे सदस्य नंदकिशोर कव्हळकर, पांडूरंग माने, हिमंत मोहकर,गोपिनाथ डेंडूळे, उमेश अनासाने उपस्थित होते. सर्वत्र डॉ. इम्तियाज लुलानिया यांचे अभिनंदन होत आहे.