वाशिम : खा.राहुल गांधी यांच्या ऐतिहासिक अशा पदयात्रेत सहभागी झालेले ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध असलेले,मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधिश मा.बी.जी.कोळसे पाटील यांना तरुणाईच्या उत्साहात सहभागी झाल्याचे पाहून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिव्यांग व तळागाळातील गोरगरीबांच्या आरक्षण व इतर समस्याबाबत त्यांची मुलाखात घेतली असता त्यांनी स्पष्टपणे सांगीतले की, "विरोधी पक्ष आज आर्थिक आरक्षणाच्या नावाखाली खुल्या गटासाठी साठ टक्के आरक्षण मिळविण्यात यशस्वी झाले असून, इतर तळागाळातील मागासवर्गिय, आदिवासी, भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांचे आरक्षण संपविण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. देशात महागाईने कळस गाठला असून, सर्वत्र खाजगीकरण करून नागरिकांना बेरोजगारीच्या खाईत लोटून नागरिकांचे खच्चिकरण केल्या जात आहे .काँग्रेस पक्षाचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिहांचा वाटा असून, गांधी घराण्याने निःस्वार्थपणे देशासाठी बलिदान केलेले आहे .
भारत देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकविण्याकरीता आज देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. त्यामुळे सत्य समोर आणण्याकरीता खा . राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सुरु असून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मी कन्याकुमारी ते काश्मिर पदयात्रेत स्वेच्छेने सहभागी झालो आहे." यावेळी मुलाखती दरम्यान कडाक्याच्या थंडीत सुध्या दि १५ नोहेंबर रोजी सकाळी, माजी न्यायाधिश मा . बी जी . कोळसे पाटील यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वहात होता. याप्रसंगी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती जमाती विभागाचे नागपूर येथील महासचिव दिनेशबाबू वाघमारे ,ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदिप वानखडे हजर होते. माजी न्यायाधिश बि.जी.कोळसे पाटील यांनी साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक तथा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, विनोद गणविर, सौ मोनाली गणाविर व त्यांच्या टिमचे अभिनंदन करून शुभाशिर्वाद दिले.