कारंजा:- (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)दिनांक १९ जुन रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेन्द्र पाटणी साहेब यांनी कारंजा लाड येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी ललित कुमार वऱ्हाडे यांनी दक्षिण आफ्रिकेतील ९० की. मी.मॅरेथॉन स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पुर्ण केली असल्याने त्यांचे कारंजा विश्राम गृह येथे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील काळात या क्षेत्रात अधिक यशस्वी होण्यास शुभेच्छा दिल्यात. यावेळी विश्राम गृह येथे भाजपा पदाधिकारी भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजीव भेंडे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत तहसिलदार कुणाल झाल्टे, पटवारी वक्ते, धानोरकर कर्मचारी उपास्थित होते.