कारंजा(लाड) : श्री.गुरुदेव सेवा मंडळाच्या वाशीम जिल्हा महिला सेवाधिकारी व मध्यवर्ती प्रतिनिधी सौ.ज्योतिताई दीपक उगले यांना नुकतेच पद्मश्री फाऊण्डेशन नागपूर व राम कृष्ण हरी विश्व मानवमंदिर मोझरीच्या वतीने, राज्यस्तरीय श्री गुरुदेव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना श्री गुरुदेव यात्रा समिती द्वारे आयोजित पंढरपूर देवदर्शन यात्रेच्या वेळी मा.वेरुळकर गुरुजी,ह.भ.प.काळे महाराज,डॉ.संजय आदमाणे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.सौ.ज्योतिताई उगले यांनी बारा वर्षापासून राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तसेच गेल्या तीन वर्षात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या ६० महिला शाखा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक महिला मेळाव्याचे आयोजन तसेच बाल शिबिरामध्ये मार्गदर्शन केले आहे. कुशल संघटन आणि वक्तृत्व कलेमुळे त्यांची जनमानसात ख्याती आहे. या पुरस्काराबद्दल गुरुदेव मंडळाचे जिल्हा सेवा अधिकारी सुनील दशमुखे,रामबकसजी डेंडूळे,गणेश गांजरे अ.भा.श्री. गुरुदेव सेवा मंडळ प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार,दीपकराव उगले सीमाताई सातपुते,आशाताई व्यवहारे,प्रा.अनुप नांदगावकर,संतोष केळकर वाशिम जिल्ह्यातील श्री.गुरुदेव सेवा मंडळ महिला व पुरुष भजनी मंडळ इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.असे वृत्त श्री गुरुदेव सेवाश्रम कारंजा यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांना कळविले आहे.