वरोरा:-
वरोरा येथील ग्राम पंचायत बोर्डा या गावातील फुकट नगर मध्ये राहणारे कवडू पाटिल, वय ६० वर्ष यांना नाते आपुलकीच्या सदस्यांनी आज दि रोजी तीन चाकी रिक्षा भेट देण्यात आली.
कवडू पाटील या वयोरुद्ध माणसाला मूल बाळ नव्हते आपली व आपल्या पत्नींची दैनंदिन उपजीविका चालविण्यासाठी त्यांच्याकडे तीन चाकी रिक्षा होती, त्यावर माल वाहतूक करून ते उदरनिर्वाह करीत होते. २५ फेब्रुवारी रोजी नेहरू चौक येथे आपली रिक्षा लाऊन ग्राहकाची वाट पाहत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ते पाणी पिण्यासाठी गेले असता त्यांची रिक्षा अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली, तीन चाकी रिक्षा चोरी गेल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठून त्याची तक्रार दिनांक 25फेब्रुवारी ला दिली. परंतू कवडू पाटिल यांना ती रिक्षा मिळाली नाही.
आज कमावले तरच खाईल अशी तीन चाकी रिक्षा चालकांनी परिस्थिती आहे. यांची माहिती प्रशांत बदकी यांनी नाते आपुलकीच्या सदस्यांना दिली. नाते आपुलकीचे संस्थे मध्ये ही महिती देताच असंख्य हात मदतीसाठी सरसावले. ग्रुप मधील सर्व मित्रांनी, ताई लोकांनी व सरांनी विश्वास दाखवून अवघ्या एका तासाच्या आतच... १५,००० रू जमा झाले.
आर्थिक सहाय्य अजून जास्त जमा होईल म्हणून तात्काळच वॉट्स ऍप स्टेटस डिलिट करण्यात आला.
यामध्ये स्टेट्स बघताच...चंद्रपूरचे वनपाल अधिकारी संतोष थिपे सरांनी ५,००० रुपयांची तर वरोरा येथील डॉ खिरटकर सर २०००, मीनाक्षी ताई देरकर १०००, चि. श्रीराज १०००, शरद पिंपळकर ५००, स्वप्नील टाळे ५००, महेश सोमलकर ५००, रजनी ताई ढूमणे ५००, निलेश बल्की ५००, मेघा ताई दखणे..३००, योगिता ताई पोडे..५००, राणी ताई कारेकर ५००, मंगला ताई बोबडे ५००, किरण ताई पिंपळशेंडे ५००, प्रशांत बदकी ५००, धनाजी चव्हाण २००, गोपाल पाल १००, ईश्वर ताजने १००, कु. नव्या महेंद्र लोणगाडगे २००, प्रकाश पिंपळकर १००...
आपल्या स्वखुशीने इच्छा शक्तीने कावडू पाटील यास मदत केली. दिनांक7मार्च रोजी यांना नवीन तीन चाकी रिक्षा देण्यात आली.
नाते आपुलकीच्या सर्व सहकार्याच्या मदतीने एका वृध्द जोडप्याला आपले खडतर प्रवास सुरू ठेवण्यात मदत झाली.नवीन गाडीची कवडू पाटील याच्या हस्ते पूजा करत गाडी सुपूर्त करण्यात आली. रिक्षा देते वेळी किसन नागरकर , डॉ.खिरटकर , प्रशांत बदकी ,शरद आसूटकर , यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कवडू पाटील या रिक्षाचालकाने सर्व सदस्यांचे आभार मानले त्या वेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....