वाशिम : अखिल भारतिय मराठी नाटय परिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमिवर संपन्न झालेल्या नाट्य कलावंत मेळाव्यात संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील महिला व पुरुष नाट्य कलावंतानी हजारोच्या संख्येत उपस्थिती लावून कलावंत मेळावा यशस्वी केला आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,सध्या नाट्यकला क्षेत्रातील संपूर्ण भारता मधील एकमेव असलेल्या, अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेची सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक वर्षाची निवडणूक येत्या दि १६ एप्रिल रोजी होत असून, आजपर्यंत सदर नाट्य संस्थेवर काही प्रस्थापित लोकांची मक्तेदारी राहून, बहुजन समाजाच्या तळागाळातील नाट्य कलावंत उपेक्षीत राहत होता. एकूणच काय की, तळागाळातील बहुजनांवर प्रस्थापितां कडून अन्यायच होत गेला व त्यामुळे सच्च्चा नाट्य कलावंत व नाट्य प्रेमींच्या समस्या जिल्ह्यात वाढतच गेल्यात .
त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नाट्य क्षेत्राची प्रगती होऊ शकलेली नाही . त्यामुळे नाट्यक्षेत्राला उजाळा देऊन नाट्य कलावंताना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यास सक्षम असणारे, हाडाचे सच्चे नाट्यकलावंत बहुजन समाजाचे, नंदकिशोर अंबादास कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख हे निवडणूक रिंगणात उतरलेले असून, त्यांच्या प्रचारार्थ वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये, बुधवारी दि. १२ एप्रिल रोजी भव्य असा नाट्य कलावंत मेळावा घेण्यात आला. सदर्हू मेळाव्याला कारंजा, मुर्तिजापूर, मानोरा, मंगरूळपिर, रिसोड, मालेगाव, वाशिम येथील हजारो कलावंतानी अप्रतिम उत्साह व आनंदात हजेरी लावल्याचे आढळून आले.यावेळी बहुतांश आजी माजी विविध राजकिय पुढारी व कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील कलाकार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य अरुणराव सरनाईक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, दिग्गज राजकिय कार्यकर्ते, कृष्णराव देशमुख, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष - संजय कडोळे (पत्रकार ),भिम शाहीर प्रज्ञानंद भगत, आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे डॉ ज्ञानेश्वर गरड आदींनी नंदकिशोर अंबादास कव्हळकर आणि उज्वल दत्तात्रय देशमुख यांना आपला पाठींबा जाहीर करून त्यांच्या मागे ठाम असल्याचे सांगत नाट्यकलावंताना त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले .