कारंजा : महायुतीने लोकसभा निवडणूकीत चारशे पार चा नारा देऊन निवडणूकीत झेप घेतली खरी,परंतु खुद्द महायुतीतील घटक पक्षातच ऐक्य नसल्यामुळे,वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या उमेद्वाराची चांगलीच फजीती होत असल्याचे कटूसत्य दिसून येत आहे.आणि त्यामुळेच महायुतीच्या उमेद्वार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ रोडशो करण्यासाठी शनिवार दि १३ एप्रिल रोजी जिल्ह्यात आलेल्या शिंदेसेनेचे स्टार प्रचारक अभिनेते गोविंदा आहुजा यांचा रोडशो फ्लॉप (अयशस्वी) झाल्याचे दिसून आले.याबाबत महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना मिळालेल्या वृत्तानुसार,वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील सलग पाचवेळा बलाढ्य दिग्गजांचा पराभव करून वेळोवेळी बहुमतांनी निवडून येणाऱ्या भाग्यवान राजयोग असणाऱ्या विजेत्या खासदार भावनाताई गवळी यांना हेतूपुरस्परपणे डावलून यावेळी महायुतीने शिंदे गटाने मराठवाड्यातील राजश्री पाटील यांना उमेद्वारी दिली.परंतु ह्या उमेद्वार वाशिम जिल्ह्यासाठी नवख्या व अपरिचित असून जिल्ह्यात त्यांचा यापूर्वी जनता जनार्दनामध्ये संपर्क नाही.तसेच स्थानिक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या तिव्र नाराजीमुळे त्यांच्या प्रचारार्थ स्थानिकचे नेते पुढे आलेले दिसतच नाहीत. शिवाय घटक पक्षात ऐक्य दिसत नसल्याने त्यांच्या प्रचारात उत्साहाचे वातावरण दिसत नाही. त्याचा परिणाम म्हणूनच महायुतीच्या उमेद्वाराच्या प्रचारार्थ दि 10 एप्रिलला स्थानिक विद्याभारती महाविद्यालयासमोर झालेली,उदय सावंत यांची सभा मतदार राजाची पाहिजे तशी उपस्थिती नसल्याने अयशस्वी झाली.त्यानंतर लगेच गांगरलेल्या महायुती कडून उमेद्वाराच्या प्रचारार्थ नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा आहुजा यांचा रोडशो आयोजीत करण्यात आला.यातही महत्वाचे म्हणजे जाहिर सभा व स्टार प्रचारका करीता लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या उमेद्वाराकडून पत्रकारांना हेतुपुरस्परपणे डावलल्या जात असल्यामुळे, हवी तशी प्रसारयंत्रणा राबवील्या जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून मतदारांची हवी तशी गर्दी जमविण्यात ते अयशस्वी ठरत आहेत.कारंजा शहरात दुपारी अभिनेता गोविंदा आहुजा यांचे आगमन झाले.सर्वप्रथम त्यांनी स्थानिक नेते युसूफ पुंजानी यांच्या कार्यालयाला धावती भेट दिली. यावेळी युसूफ पुंजानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार केला.त्यानंतर प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही न करता, व प्रचाराचे सभास्थळी न जाताच बंद गाडीमधून यवतमाळ कडे मार्गक्रमण केले. प्रचाराकरीता आलेल्या गोविंदानी प्रचारार्थ जाहीर सभा न घेतल्याने चाहत्याची मात्र निराशा झाली. यातही महत्वाचे म्हणजे उमेद्वार असलेल्या राजश्रीताई पाटील ह्यादेखील काही कारणामुळे स्वतः यावेळी अनुपस्थित असल्याचे वृत्त मिळाले आहे. त्यामुळे "गोंविदा तर पळून गेला आता हेमामालिनीला आणा की कंगना राणावतला . . . . " अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत असल्याचे दिसत आहे.