कारजा येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक 07 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात समीक्षा सराफ व रविना कोपरकार या आदर्श विद्यार्थीनीचा आदिशक्ति पुरस्काराने,उपस्थित मान्यवराच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. याविषयी मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला दिलेले अधिक वृत्त असे की,
आदिशक्ति महिला बहुउद्देशीय सस्था वाल्हाई ता.कारंजा तर्फे गेल्या सात वर्षापासून दरवर्षी,माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या मुलीला या पुरस्काराचे वितरण करण्यात येत असते. त्याअंतर्गत, बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या विद्यार्थिनी , कु.समिक्षा सराफ व कु.रविना कोपरकार या दोघीना इयत्ता दहावीच्या परीक्षेत 88.40% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवल्यामुळे दोघीना आदिशक्ति पुरस्कार देण्यात आला.त्यामधे प्रत्येकी रु.1000/- चा धनादेश व सन्मानचिन्ह समावेश होता.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख अतिथि म्हणून आदिशक्ति महिला बहुउद्देशीय संस्थेचे संचालक प्रो.निर्मलसिंह ठाकुर व संस्थेचे संचालक देविदास काळबांडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेश शेंडेकर यांनी केले.आदिशक्ती पुरस्कार देण्यामागची भूमिका प्रो.निर्मलसिंह ठाकुर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय भड यांनी आदिशक्ति महिला बहुउद्देशीय संस्थेचे आभार व्यक्त केले.कारण ही संस्था सातत्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचलन अनिल हजारे तर आभार गोपाल काकड यांनी मानले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्म.व विद्यार्थी उपस्थित होते.