ब्रह्मपुरी शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक नगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
आपल्या नगरीचा वारसा जपत संमित्र सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा, स्वर्गीय प्रा. प्रकाश आयदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मित्र क्रीडा मंडळ ब्रह्मपुरी यांचे तर्फे भव्य खुले राज्यस्तरीय आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयचे प्रांगणात दिनांक 17 सप्टेंबर व 18 सप्टेंबर 2022 ला आयोजित करण्यात आलेली आहे.या स्पर्धेत अमरावती, नागपूर, रायपूर, चंद्रपूर, राजनांदगव व ब्रम्हपुरी येथील नामांकित चमुनीं भाग घेतलेला आहे. गेल्या 38 वर्षापासून सतत ब्रह्मपुरी येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे या परंपरेला खंड पडल्याने स्पर्धा होऊ शकल्या नाही परंतु यावर्षी नव्या जोमाने भव्य बोस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर रामदासजी आंबेडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरनाचा कार्यक्रम आयोजित केला असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार अशोकजी नेते चिमूर गडचिरोली लोकसभा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून अविनाश पुंड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर,डॉ.अतुल नागरे,डॉ.देविदासजी जगनाडे, फादर रे कुरियन व यशवंत दिघोरे उपस्थित राहणार आहे.या स्पर्धेत स्वर्गीय ओंकारलालजी जाजू स्मृती चषक व रोख १५००० रुपयाचा प्रथम पुरस्कार असून द्वितीय पुरस्कार स्वर्गीय भैय्याजी नागरे स्मृती चषक व रोख १०००० रुपये तर तृतीय पुरस्कार स्वर्गीय अभिजीत जगनाडे स्मृती चषक व रोख ७००० रुपये तसेच बेस्ट प्लेयर बेस्ट शूटर व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्याकरता सुद्धा विशेष पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली