कारंजा (लाड) : कारंजेकर नागरीकांची मने जिंकून,ग्राहक-ठेवीदारांच्या विश्वासाला सार्थक ठरल्यामुळे, निवडणूका संपताच, पतसंस्थेच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असून,आपल्या ठेवी सुरक्षीत ठेवण्यासाठी संस्थेकडे ठेवीदार आकर्षीत होत असल्याची शुभ वार्ता मिळत आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अल्पावधीतच कारंजा नगरीतील वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या 'प्रशिक' ग्रामिण सहकारी पतसंस्थेचा नावलौकीक आज विश्वभरात झाला आहे.असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.संचालक मंडळांनी प्रशिकचा कारभार हातात घेतला.त्यावेळची संस्थेची परिस्थिती ही एखाद्या लहान रोपट्या प्रमाणे होती.आज मात्र ह्या रोपट्याचा विशालकाय बोधीवृक्ष झाल्याचे दिसून येत आहे.सुरुवातीला या संस्थेत ठेवी ठेवण्याचा ग्राहक दहा वेळ विचार करीत होते.त्यावेळी संस्थेकडे केवळ पाच लाखाच्या ठेवी होत्या.मात्र प्रामाणिक,इमानदार,कर्तव्य तत्पर व विश्वासू संचालक संस्थेला लाभल्यामुळे व त्यांच्या पारदर्शी कारभारामुळे आज ह्या पतसंस्थेत ठेवी ठेवण्याची चढाओढ लागते.आज पतसंस्थेच्या ठेवीच्या रकमांनी तब्बल साठ करोड रुपयाची उंची गाठलेली आहे.त्याला कारणही तसेच आहे पतसंस्थेला व्यवस्थापिकेच्या रूपाने सौ.आशाताई राऊत यांच्या सारख्या शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर,अनुभवी,अभ्यासू, विश्वासू व पतसंस्थेच्या विकासाची दूरदृष्टी ठेवणाऱ्या व्यवस्थापिका सौ.आशाताई राऊत ह्या लाभलेल्या आहेत. त्यांच्या कार्याची विशेषतः म्हणजे,त्या एकही रजा न घेता, दिवसाचे १४ ते १५ तास काम करीत असतात.
त्यांच्या अथक प्रयत्नातून प्रशिक पतसंस्थेने विकासाचे उंच शिखर गाठले आहे.आज एकीकडे मोठमोठ्या बँका दिवाळखोरीमुळे डबघाईस येत असतांना,प्रशिक पतसंस्थेने मात्र ग्राहकांचा विश्वास संपादन करून,भक्कमपणे पाया रोवून, सहकार क्षेत्रात आपला झेंडा सर्वत्र फडकवीला आहे.त्यामुळे विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी न पडता,त्यांच्या खोट्या भूलथापांना दाद न देता, प्रशिकच्या संचालकाच्या विकास पॅनलने एकहाथी विजय प्राप्त करून सुवर्णाक्षरांकीत इतिहास घडवीला आहे.विशेष म्हणजे विकास पॅनलच्या विजयी उमेद्वारांनी उदार अंत:करणाने या विजयाचे श्रेय व्यवस्थापिका सौ.आशाताई राऊत यांच्या अपार कष्टाला आणि संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांना दिले आहे.सदहू निवडणूकीत ॲड. रवी रामटेके यांना १४६० मते ; आकाश कऱ्हे १०८८ ; आशिष बंड ११२७ ; पांडूरंग भगत १०९८ ; ओंकार पाढेण ११४० ; गुलाबराव साटोटे ११२० ; कृष्णा राऊत ११६० ; प्रशांत काळे १३१३; मेघराज जुमळे १३४३; सौ.सुनिता उके १२५२ ; डॉ.सौ. अनघा उकर्डे यांना १२९५ मते मिळाली. बँकीग क्षेत्रातील ही निवडणूक एखाद्या मोठ्या निवडणूकी प्रमाणे गाजली होती. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागलेले असतांना, कोणत्याही खोट्या अफवांना आणि नकारात्मक प्रचाराला बळी न पडता संस्थेच्या सभासद मतदारांनी विद्यमान संचालकावर आपला अढळ विश्वास दाखवून त्यांच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यामुळे निवडणूका पार पडताच संस्थेचे कामकाज व व्यवहार परत मोठ्या उभारीने सुरू होऊन, बँकेच्या ग्राहक ठेवीदारांमधे वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याचे श्रेय खरोखर संस्थेच्या इमानदार,प्रामाणिक,पारदर्शी, शिस्तप्रिय,कर्तव्यकठोर प्रशासनाला दिले पाहिजे.असे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.