कारंजा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)एक वर्षापूर्वी कोव्हिड 19 कोरोना महामारीच्या महासंकटामधून महाराष्ट्रातील नागरिक सावरत असतांनाच सन 2023 मध्ये,अलनिनोचे नैसर्गीक संकट घोंघावत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मान्सूनचा पाऊस उशीरा सुरु होत असून, सरासरी पेक्षा कमी प्रमाणात येणार असल्याचा अंदाज दिसत असून,या पर्जन्यमानाचा पिक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय काही भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य सुद्धा जाणवू शकते त्यामुळे काही भागात पाटबंधारे विभाग पिण्याच्या पाण्या करीता धरणाचे पाणी राखीव ठेवू शकते. या सर्वांचा परिणामाने शेतकर्याचा जीव कासावीस होऊ शकतो मात्र याही नैसर्गीक संकटात बळीराजाने धिर सोडायला नको तर या आसमानी संकटाला आत्मविश्वासाने व धैर्याने तोंड देण्याकरीता नव्या स्फूर्तीनं उभं राहील पाहीजे. व त्यादृष्टिन नियोजन केलं पाहीजे. तसेच या परिस्थितीने देशात आणि राज्यात प्रचंड प्रमाणात महागाई वाढू शकते.आणि या महागाईचा अंदाज घेऊनच, शेतकर्यांसह,गोरगरीब,मजूर, कामगार आणि मध्यमवर्गीयांनी सुद्धा त्यांच्या संसाराच्या राहाटगाडग्या करीता,योग्य नियोजन केलं पाहीजे. त्यासाठी आपल्याकरीता असलेला पैसा वाचविणे, आपल्या वायफळ खर्चांना आळा घालून, खर्चावर नियंत्रण मिळविणे.अन्न धान्याची साठवणूक करणे. कोरोना काळात ज्याप्रमाणे मोजक्या लोकांमध्ये विवाह समारंभ व्हायचे. त्याची पुनरावृत्ती करीत कमित कमी खर्चात व मोजक्याच लोकामध्ये सर्व कार्यक्रम आटोपले पाहजेत. व मुख्य म्हणजे जास्तितजास्त खर्च टाळून अलानिनोच्या दुष्काळी संकटाला तोंड दिलं पाहीजे.