काजळेश्वर उपाध्ये:एका मतिमंद २० वर्षीय तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार दि.३० मे रोजी सायंकाळी ०५ : ०० वाजताच्या दरम्यान खेर्डा काजळेश्वर मार्गावरील उमा प्रकल्पाच्या पुलाखाली उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच काजळेश्वरचे उपसरपंच,पोलिस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले.आणि घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.त्यानुसार पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला.सूत्रांच्या माहितीनुसार माया अनेस कोडापे वय अंदाजे २० वर्ष रा.काजळेश्वर असे मृतदेह आढळलेल्या मुलीचे नाव असून ती मतिमंद होती.दरम्यान दोन दिवसापूर्वी ही मुलगी वाट चुकल्याने कारंजा धनज मार्गावर आढळली होती.यावेळी पत्रकार आणि पोलिसांनी तिला कारंजा येथील ग्रामीण पोलिस स्टेशन जवळ झोपडीत राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या स्वाधीन केले होते.मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असल्याने आणि चेहरा विद्रूप झाल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी व ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.