जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सहकार क्षेत्रातील मातब्बर पोरेड्डीवार गटाचे १८ पैकी १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची हे चार तालुके समाविष्ट असलेली ही महत्त्वाची बाजार समिती आहे.
आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून पोरेड्डीवार गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघ गटातून पोरेड्डीवार गटाचे खीळसागर नाकाडे, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती मतदारसंघ गटातून रत्नाकर धाईत, ग्रामपंचायत मतदारसंघ गटातून सुरेश काटेंगे, हमाल मापाडी मतदारसंघ गटातून धंनजय ठाकरे, व्यापारी अडते मतदारसंघ गटातून गुरुमुखदास नागदेवे व मुनेश मेश्राम बिनविरोध निवडून आले.