वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : मुलां मुलीं कडून दुर्लक्षित असणारे व निराधार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा पाहून, शासनाने त्यांना मदतीचा हात देण्याकरीता आवाहन केले आहे. तरी समाजातील जागरूक व्यक्तींनी आपल्या सभोवती , आपल्या शेजारी किंवा तुमच्या गावात असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तिंना मार्गदर्शन करून आधार मिळवून द्यावा.ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध सोयीसुविधा, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन-एल्डरलाईन 14567 ही सुविधा उपलब्ध असून हा हेल्पलाईन क्रमांक टोल फ्री आहे.
एल्डरलाईनकडून आरोग्यविषयी जागरूकता, उपचार, वैद्यकीय सुविधा आहाराबाबत मार्गदर्शन, निवारा केंद्र, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, विरंगुळा केंद्र, विपश्यना व ज्येष्ठांसंबंधी साधने, वैयक्तिक व कौटुंबिक याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन, विवादाचे निराकरण, आर्थिक सेवानिवृत्ती संबंधी, इच्छापत्र बनविणे तसेच शासकीय योजनांची माहिती देऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
ज्येष्ठांना चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, जोडीदाराचा वियोग, वेळ, ताण, राग एकटेपणा दूर करून सकारात्मकता निर्माण करणे याबाबतच्या जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक आधार दिला जातो. बेघर अत्याचारग्रस्त, सोडून दिलेल्या ज्येष्ठांना मदत, दुर्लक्षित ज्येष्ठांची काळजी घेणे व त्यांना आधार देणे आणि गरजू व निराधार ज्येष्ठ नागरिकांना निवाऱ्याची सोय व इतर मदत व सहकार्य करण्याचे काम 14567 या टोल फ्री क्रमांकाच्या 24567 या हेल्पलाइन एल्डरलाईन वर सेवा मोफत पुरविल्या जातात. अधिक माहितीसाठी क्षेत्रीय प्रतिसाद अधिकारी ज्ञानेश्वर टेकाळे (७७२१९४१०५१) यांच्याशी संपर्क साधावा.
आपल्या प्रतिक्रिया द्या....