नागभिड: चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या कौशल केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला.याप्रसंगी नागभीड तालुक्याचे नायब तहसीलदार श्री सुजित बांगरे यांच्या हस्ते रिबीन कापून कौशल केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रेवेन्यू इंस्पेक्टर श्री राऊत साहेब, डॉक्टर स्वप्नील कांबळी, श्री सचिन मस्के, विद्यालयाचे प्राचार्य मिना मनी यांची प्रमुख उपस्थिती होती. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या मीना मने यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर शाळेच्या संगीत विभागातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले. सकाळी 11 वाजता दीप प्रज्वलन करून कार्यक्रम आरंभ करण्यात आला. या प्रसंगी जवळपासच्या गावातील कौशल्य केंद्रात नोंदणी केलेल्या संपूर्ण महिला उपस्थित होत्या. या कौशल्य केंद्रात "टेलरिंग" काम शिकविण्यात येणार असून, त्याकरिता नोंदणीकृत महिलांना रोज चार तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या यांनी सर्व उपस्थित उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांचे यावेळेस आभार व्यक्त केले. व नंतर अल्पोहार व चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.