कारंजा : भारतिय लोकशाहीच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून,येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ रोजी, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत,कारंजा शहरात
तिरंगा सन्मान बाईक रॅलीचे आयोजन तिरंगा सन्मान यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजाप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा घर घर तिरंगा' अभियानाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयात १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रध्वज फडकवण्यात येतं आहे. तसेच नागरिकांनाही आवाहन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून तिरंगा सन्मान बाईक रॅलीचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजेला करण्यात आले आहे.सदर रॅली सकाळी १० वाजता, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधुन निघणार असून, ही बाईक रॅली स्थानिक इंदीरा गांधी चौक , महात्मा फुले चौक , छत्रपती संभाजी चौक, विठ्ठल मंदिर , गुरुमंदीर , रामासावजी चौक , दत्त मंदीर , पोहा वेश , शिवाजी नगर , जय स्तंभ चौक , छत्रपती शिवाजी चौक, मार्गे जाऊन परत कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन समारोप होईल.
तरी आपल्या राष्ट्रध्वजाप्रती असलेला अभिमान व्यक्त करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये उपस्थित राहून तिरंगा सन्मान बाईक रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
आमदार श्रीमती सईताई डहाके तथा तिरंगा सन्मान यात्रा महोत्सव समिती कारंजा यांनी केले आहे.असे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे
.
आपल्या प्रतिक्रिया द्या....