कारंजा (लाड) : स्वत:च्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आणि जीव धोक्यात घालून अविरतपणे समाजसेवा करणाऱ्या पत्रकारांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जात आहे त्यामुळे पत्रकाराचा सन्मान करण्याच्या दृष्टिने,जागतिक परिषदेने ( UNESCO),२६ व्या सर्व साधारण सभेत,सन १९९३ मध्ये ३ मे हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्यदिन म्हणून घोषीत केलेला होता.त्या निमित्ताने स्थानिक दि.अकोला-वाशिम मध्यवर्ती सहकारी बँक लि.अकोलाच्या कारंजा शाखेचे वतीने आयोजीत कै.वा.रा.उपाख्य अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी शुभारंभ सोहळ्यात,कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, साहित्यीक,लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार,साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकारनेते श्रीधर पाटील कानकिरड,माजी नगराध्यक्ष जेठूसेठ उपाख्य नरेंद्रजी गोलेच्छा यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत,त्यांना त्यांच्या "कुणाबद्दलही आकस न ठेवता,ते करीत असलेल्या प्रामाणिक व निःस्वार्थ पत्रकारितेबद्दल त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्यात." यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया,माजी संचालक प्रभाकरराव वानखडे, सौ.आशाताई गाडगे,विश्वनाथ पाटील ताथोड,तुळशीरामजी मुंधरे,मंगेश काळे,दत्तात्रय चौधरी व शेकडो शेतकरी बांधवाची उपस्थिती होती.
तसेच तसेच बँक कार्यालयात शाखा व्यवस्थापक दत्तात्रय चौधरी,कारंजा खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक आशिष ठाकरे यांनी सुध्दा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पत्रकारीतेचे कौतुक केले.असे वृत्त हिमंतराव मोहकार यांनी कळविले आहे.