अकोला अविकसित भागाचा विकास करणे व नागरिकांना मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे अध्यात्म आणि धर्म सोबत विज्ञान तसेच सामाजिक दायित्व
म्हणून मतदाराविषयी असलेली आपुलकी जनसंवादाच्या माध्यमातून अपेक्षित विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले-
अकोला पूर्व मतदार संघातील प्रभाग क्र. ३ जगजीवन रामनगर, टेलिफोन कॉलनी येथील श्री हनुमान मंदिर संस्थानाचा संपूर्ण प्रांगण तार फेंसिंग व सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत आणखी विकास पूर्ण कामे करण्याचे आश्वासन आ. रणधीर भाऊ सावरकर यांनी दिले, कार्यक्रमाला महानगर सरचिटणीस Adv. देवाशिष काकड, नगरसेवक हरीश काळे, सागर शिगोकार , प्रकाश रेड्डी अकोला पूर्व सचिव जितेन देशमुख,बूथ प्रमुख रवी यादव, ध्रुव खुणे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाजत गाजत आमदार रणधीर सावरकर यांचे स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून मातृ शक्तीने आपल्या लाडक्या भाऊ रणधीर यांचे स्वागत केले.