मंगरूलपीर : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) दि 14जून रविवारी सायंकाळी 5 : 30 वा. टी एस के मंगल भवन, (तुरे हॉल) नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड येथे मंगरूलपीर निवासी वाशिम पत्रकार संघाचे जिला अध्यक्ष विनोद डेरे यांना
शिवरायांचे वंशज युवराज संभाजी राजे,तसेच भीमरायांचे वंशज मा.आनंदराज आंबेडकर सरसेनानी रिपब्लिकन सेना, मा .राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, मा .सुनील तटकरे, खासदार , रायगड-रत्नागिरी मा.आदीती तटकरे आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विनोद डेरे यांचे कार्याची दखल घेउन त्यांचे पाठीवर कौतुकाची थापदेण्यासाठी Max Maharashtra Award
प्रदान करण्यात आला .
सदर कार्यक्रमाचे आयोजन मैक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे. विनोद डेरे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.