वाशिम : कला हेच जीवन समजून, समाजप्रबोधन,जनजागृती व राष्ट्रीय कार्यक्रमाकरीता योगदान देणाऱ्या वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनाकरिता मागविण्यात येणाऱ्या प्रस्तावाची मुदत ३१ ऑगष्ट २०२५ पर्यंत वाढविण्याची मागणी राज्यसरकारकडे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की,ज्या लोककलावंतानी कलेकरीता आपले सर्वस्व वाहिले.आणि निव्वळ लोककलेच्या उत्पन्नातून ज्यांचा उदरनिर्वाह होता.अशा खऱ्या लोककलावंताना म्हातारपणी सन्मान मिळावा.आणि त्यांच्या उदरनिर्वाह किंवा औषधोपचाराची सोय व्हावी.या उदात्त हेतूने राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना चालवीली जाते.परंतू सदर योजनेची अंमलबजावनी जास्तित जास्त पारदर्शी पद्धतीने व्हावी.व खऱ्या लोककलावंताना जलद गतीने न्याय मिळावा.म्हणून शासनाने सदर योजना डिजीटल (आधुनिक) पद्धतीने राबविण्याचे धोरण आणून सदर योजनेचे प्रस्ताव ऑनलाईन मागवीले आहेत.मात्र त्याकरीता हवा तेवढा प्रचार प्रसार करण्यात आला नाही.तसेच ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम तारिख दि ३१ जुलै २०२५ देण्यात आली आहे.परंतु लोककलावंताना प्रस्ताव सादर करण्यासाठी १) अधिवास प्रमाणपत्र २) उत्पन्नाचा दाखला ३) भारत सरकारच्या नोटरी कडून प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र अत्यावश्यक करण्यात आलेले असून सदरची कागदपत्रे ऑनलाईन काढायला साधारणतः एक आठवड्याचा कालावधी लागतो.त्याखेरीज सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असून सतत पाऊस बरसत आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील खेडोपाडीच्या लोककलावंताची अडचण व गैरसोय होत आहे.त्यामुळे शासनाने वर्तमान परिस्थिती समजून ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्याची मुदत वाढवून,दि. ३१ जुलै २०२५ ऐवजी दि ३१ ऑगस्ट २०२५ करावी.अशी विनम्र मागणी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मा. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मा. संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचेकडे केली आहे.