वाशिम : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे,पाऊसमानात बदल होऊन, यंदा दर महिन्यालाच आकस्मिक पणे वारे वादळ, अवकाळी, गारपिट आणि विजांचा कहर सुरु होऊन, होणाऱ्या अस्मानी कहरामुळे बळीराजासह ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः विस्कळीत होत असून, नागरिकांचे शेती,जनावराचे नुकसान होत असून,जिवीत हानी होत आहे.याचाच प्रत्यय गुरुवारी दि. 09 मे 2024 रोजी पुन्हा आला. याबाबत अधिक वृत्त असे की, प्रखर उन्हाने अंगाची लाही होत असतांना अचानक भर दुपारी मंगरूळपिर परिसरात विजाच्या कडकडाटात रिमझिम सरींसह पाऊस सुरु झाला. यावेळी मंगरुळपीर तालुक्यातील मौजे जांब येथे अंगणात लहान मुले खेळत असतांना विज पडून कु. दुर्गा दिनेश कांबळे वय 14 ही मृत्युमुखी पडली तर कु. रविना धम्मपाल सुर्वे हिला शेक लागून जखमी झाल्याची घटना घडल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या संदर्भात अधिक तपास सुरु असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले