कारंजा(लाड)(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे.) कारंजा नगरपालिकेच्या १००% प्रशासकिय कारभारावर लोकप्रतिनिधीचा कोणताही अकुंश नसल्याने,नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांच्या सर्व निवेदनाला,कोणतीच दखलपूर्ण कार्यवाही न करता कचराकुंडी दाखविल्या जाते की काय ? अशी शंका निर्माण होत असल्याचा सवाल कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केला आहे ? याबाबत सविस्तर वृत्त असे की,
स्थळ : तनयनगर ; खान पेट्रोल पंपामागे राहणारे सचिन देशमुख यांच्या घराजवळ रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार निघुन गेल्याने व नाली वरील धाबा अर्धवट असल्याचे, परिसरातील सुज्ञ नागरीक सचिन देशकरी यांनी वारंवार निवेदन देऊन नगरपरिषद कार्यालयाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.परंतु कुंभकर्णी झोपेच्या अधिन असलेल्या कारंजा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन दुरुस्ती न केल्याने अखेर, देशकरी यांचा आठ महिन्याचा मुलगा आई समवेत चालता चालता पडला व त्याच्या नाजूक पायाच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले. यामुळे कारंजा शहरामध्ये समाजमाध्यमावर नगर पालिकेच्या ढिसूळ कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असून वारंवार सांगूनही जनतेच्या तक्रारीकडे हलगर्जीपणा करत असलेलं नगर परिषद नेमकी कोणाची ? जनतेची की ठेकेदारांची ? हा प्रश्न देशकरी यांनी विचारला व जर कोणाचा जीव गेला असता तर मग कार्यवाही कोणावर केली असती ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.