एट्टापल्ली गडचिरोली 1 एप्रिल :- एट्टापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या मुसपर्शी जंगल परिसरात आज सकाळी १० वाजता च्या दरम्यान C 60 पोलीस जवान नक्षल विरोधी शोध मोहीम राबवत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीसाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलीसही जशास तसे उत्तर दिले.
या झालेला चमकित एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे . चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत असून, अजूनही चकमक सुरू सुरू असून सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे.