ब्रह्मपुरी: तालुक्यातील सोंदरी येथील गोपाल राजीराम पारधी वय(२३) हा युवक खाजगी विद्युत कामगार म्हणून गाव परिसरात कार्य करत होता मात्र गावातील काही लोकांचे शेतातील विद्युत पंपाचे वेळेवर गोपालने काम करून न दिल्याने गावातील आठ-दहा शेतकऱ्यांनी त्याला घरी येऊन ११ मार्च रोजी जीवे मारण्याची धमकी दिली व त्याच मध्यरात्री ही घटना घडली असून दि.१२ मार्च रोजी सकाळी गोपालचा शरीर गावातील शेत शिवारात संशयितरित्या मृत अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे . शिवाय ब्रह्मपुरी पोलिसांकडून घटनेचे पंचनामा व तपास थातूर मातूर करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.त्यामुळे पोलिस विभागावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत असून गावातील धमकी देणाऱ्या आठ-दहा शेतकऱ्यांनीच माझ्या मुलाला ठार मारले असल्याचा अंदाज मृतक गोपाल आई यमुनाबाई राजीराम पारधी यांनी दिनांक १९ मार्च२०२२रोजी शनिवारला सायंकाळी ५ वाजता ब्रह्मपुरी येथील स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
सदर घटनेची सखोल चौकशी करावी व मला योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मृतक गोपालची आई यमुना राजीराम पारधी यांनी केली आहे यावेळी पत्रकार परिषदेला सोंदरीचे सरपंच केवळराम पारधी. यमुना पारधी. विष्णू आंबोने(मृतकाच्या जावई) योगीराज पारधी (चुलतभाऊ) कुंदा कमाने आधी उपस्थिती होते
प्रतिक्रिया
सदर घटनेसंदर्भात आमचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार काय आहे हे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई करू