अविकसित शेती व रोजंदारी कामाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील युवक युवतीचे दर रोज पलायन होत आहे. फक्त वर्ष भर खाण्या पुरता उत्पन्न देणारी असिंचित व अविकसित शेती ,मनरेगा , वनविभाग , आणि बांधकाम क्षेत्रा मध्ये रोजंदारी मजुरी च्या कामाच्या अभाव मुळे गावातील युवक युवती कामा साठी बाहेर गावी शहरामध्ये जात आहेत .आंध्रा तेलंगणा मध्ये इमारती बांधकामासाठी बहुतेक ग्रामीण रोजी साठी मजूर म्हणून जात आहेत. युवती पोल्ट्री फार्म मध्ये अंङे जमा करण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी जात आहेत .संवेदनशील आदिवासी गावातील युवक इमारत बांधकाम मध्ये सेट्रींग आणि स्लब चे मेहनती काम करण्यात सक्षम असल्यामुळे कंत्राटदार गावात येवुन त्याना घेऊन जातात .तेथील कंत्राटदारांना चांगल्या प्रतीचा मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. तसेच इथल्या युवतींचे शेती कामासाठी चांगल्या पसंती आहे .एटापल्ली भामरागङ सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील ग्रामीण सिरोंचा वरून गोदावरी प्राणहिता पूल बांधकामा मुळे सरळ जात आहेत .किती युवक युवती पलायन करत आहेत याची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी व्हावी. आणि श्रम आधिकारीना सुध्दा माहीती पाठवावी .जेणे करून काही धोका झाल्यास मदत करता येईल. कित्येक ग्रामीणाना काही कंत्राटदार आर्थिक शोषण करतात तर काहीना दुखापत होतो .काही लोक कामावर इमारती वरून खाली पङले त्याना काही ही मोबदला देण्यात आली नाही.
तेंलगाणा आंध्रामध्ये मजूर वर्ग नाही :-
तेंलगाणा मध्ये 1 रू किलो बारीक तांदुळ. एकरी दोन फसल साठी वीस हजार अनुदान दरवर्षी. विधवा व श्रावणबाळ , अपंगांना दर महिण्या दोन हजार आणि मुलीच्या लग्नासाठी दीङ लाख रू अनुदान ह्या योजना मुळे मजूर वर्ग रहीलेला नाही