कारंजा (लाड) : कारंजा येथील मागील पंधरा वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अविष्कार सामाजिक क्रीडा शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि. 31 मार्च 2025 रोजी शेतकरी निवास मंगरूळपीर रोड बायपास येथे एक दिवशीय स्व.मा.आ. प्रकाश दादा डहाके स्मृती प्रित्यर्थ अविष्कार कारंजा नाट्यमहोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विशेष आकर्षण म्हणून असंख्य मराठी चित्रपट सृष्टी मधील अभिनेते /अभिनेत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे त्यामध्ये जेष्ठ नाटककार मा. अरुणजी घाटोळ मराठी चित्रपट काळोखेच्या पारंब्या फेम अभिनेत्री.. काजल राऊत मा. विशाल तराळ तुझी माझी जमली जोडी फेम अभिनेते मा.अनुप बहाड मराठी चित्रपट
एक क्षण विलक्षण चे निर्माते दिग्दर्शक मा.के संतोष कुमार मराठी चित्रपट तेल व फेम अभिनेत्री सरलाताई वावधाने संत गजानन शेगावीचे मालिका फेम मा.श्री.दीपक नांदगावकर स्वराज्य रक्षक संभाजी तथा स्वामिनी फेम अभिनेते मा नितेश ललित या नाट्य महोत्सवामध्ये उपस्थित राहणार असून पहिल्या सत्रामध्ये सकाळी दहा वाजता कारंजा लाड मधील तब्बल 16 महिला भजनी मंडळ आपले भजन सादर करतील दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी साडेबारा वाजता अविष्कारचे गजानन पवार व सतीश शिवहरे एकपात्री सादर करतील तदनंतर उद्घाटन सोहळा हा मा.श्रीमती सई ताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली तर मा. प्रसन्ना भाऊ पळसकर हे नाट्य महोत्सवाचे उद्घाटन करतील प्रमुख अतिथी म्हणून मा. दत्तरावजी डहाके मा. राजेशजी राय मा. विजयजी काळे मा. डॉक्टर अजयजी कांत मा. रवींद्रजी मुकवाणे,श्रीमती ललिताबाई माकोडे मा.प्रमोद जीरापुरे मा. संदेशजी जिंतूरकर मा. अमोल भाऊ लुलेकर मा. सुनीलजी भिंगारे मा.ब्रिजमोहनजी मालपाणी मा.निलेशजी सोळंके मा.सत्यजितजी गाडगे मा. दत्तराजजी दिग्रसकर मा. शरदजी कर्वे मा. संजयजी काकडे मा. देवेंद्रजी मुकुंद मा. डॉ कुंदनजी श्यामसुंदर मा. ज्ञानेश्वरजी खंडारे मा. प्रवीणजी साबू मा. कुणालजी महाजन मा. अक्षयजी जगताप मा. आशिषजी गावंडे मा. मनीषजी रगडे मा. महेश चौधरी हे उपस्थित राहणार असून स्वागत गीताची जबाबदारी मा. देवलालजी बोर्डे सर तथा चमु घेतील तर नंतर कारंजा लाड येथील राज्यस्तरीय तथा कामगार नाट्य स्पर्धेत विशेष प्राविण मिळविलेल्या कलावंतांचा सत्कार सोहळा तथा कारंजा लाड येथील समस्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येईल सत्र तिसरे मध्ये दुपारी तीन वाजता शिवतीर्थ रिसॉर्ट अँड लॉन येथे पत्रकार व चित्रपट मालिका अभिनेते अभिनेत्री यांचा संवाद कार्यक्रम होईल.सत्र चौथे मध्ये सायंकाळी 600 वाजता मा.देवलालजी बोर्डे सर व चमू यांची नांदी व 6.30 वा.मा. दत्तराजजी डहाके व सौ.राजलक्ष्मीताई डहाके यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात येणार असून सायंकाळी 7 वाजता शैलेश गोजमगुंडे लिखित व अश्विन जगताप दिग्दर्शित दोन अंकी नाटक उंच माझा झोका ग हे सादर होईल या नाटकाचे निर्माते प्रमोद जीरापुरे हे असून नैपथ्यअंकित जवळेकर प्रकाशयोजना सौ अश्विनी जगताप पार्श्व संगीत अंकुश टोग नैपथ्य सहाय्यक अनिकेत चव्हाण सुरज जोंधळे अभिनव भालेराव, रंगभूषा सौ.सोनाली येळणे वेशभूषा अर्पिता रामदेवकर वेशभूषा वंदना खंडारे यांनी सांभाळली असून यामध्ये कलावंत म्हणून कारंजा मधीलच श्रद्धा रगडे,कु वैष्णवी गाढवे, सतीश शिवहरे राजेश परळीकर गजानन पवार,अंजली कोळसकर, अमृता राठोड, तेजस्विनी वरठी, मयुरी गाढवे आचल साहू, साक्षी भापकर, संजय सांगळे,दत्तराज दिग्रसकर,ज्ञानेश्वर खंडारे तर बालकलावंत म्हणून सई रेनगडे व आराध्या बलखंडे असतील कारण जे करांना अतिशय सुंदर अशा नाट्यमहोत्सवाचा आस्वाद घेता येईल असा उपक्रम राबविण्यात असल्याबद्दल अविष्कार प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे.