तालुक्यातील शंकरनगर येथे आपल्या शेतात कुटुंबियांसोबत वास्तव्यात असलेल्या श्रीमती कौशल्या राधाकांत मंडल या महिलेवर रानटी हत्तीने हल्ला करून सोंडेत पकडून जमिनीवर आपटले व पायाने तुडवले. यामध्ये ती महिला मृत झाली. त्या मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने १कोटी रुपयाची आर्थिक मदत देऊन वारसानांपैकी एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी च्या वतीने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आले.
रविभवन, नागपूर येथील कुटीर क्र.२७ मधील नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर,तालुका अध्यक्ष अमीन लालानी, जिल्हा उपाध्यक्ष चिनी मोटवानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून रानटी हत्तीचा आरमोरी तालुक्यात हैदोस सुरु आहे. आजपर्यंत रानटी हत्तीकडून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची भरपूर प्रमाणात नासधूस झाली आहे. तर अनेक नागरिकांच्या घरांची सुद्धा स नाशधुस झालेली आहे. रानटी हटत्तीमुळे तालुक्यातील शंकरनगर, जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, सालमारा, कणेरी, रामपुरी या भागातील नागरिक दहशतीत आहेत. त्यामुळे रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा.
वनविभागामार्फत रानटी हत्तीना हाकलून लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. हत्ती ज्या परिसरात आहेत त्या परिसरातील नागरिकांना योग्य सुचना व संरक्षण दिल्या जात नाही. म्हणून अशाप्रकारच्या घटना घडून जीवितहानी होत असतात. म्हणून चौकशी करून दोषी वनाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.