जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापुस मका तुर गहु कांदा मिरची टमाटो व भाजीपाला तसेच फळबागांचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या
वतीने तहसीलदार डॉ. सारिका भगत यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
याठिकाणी वादळी व अवकाळी पावसाने तालुक्यांतील मका कापुस गहु कांदा मिरची टमाटो तूर हरभरा शेडनेटचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामूळे तालुक्यामध्ये सर्वत्र पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे
त्यादरम्यान निवेदनावर उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील गव्हाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, तालुकाप्रमुख कुंडलिक मुठ्ठे, गजानन शिंदे, चंदु शिंदे, शिवाजी म्हस्के, हरीचंद्र म्हस्के, परमेश्वर सरोदे, शंकर रगड, प्रेमानंद जाधव, शेख इरफान यांच्यासह आदीच्या सह्या आहेत.