कारंजा लाड -- वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज ओळखून, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या, दि जैन महासमितीने वृक्षारोपणासारखा उपक्रम राबवून पर्यावरणविषयक समतोल साधण्याचा महासमितीचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत कारंजा येथील उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी महासमितीच्या सेवाव्रती कार्याची प्रशंसा केली.
दि जैन महासमिती कारंजा संभागच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी दि जैन महासमिती बद्द्ल प्रशंसोद्गार काढले.
पुढे बोलतांना देवरे साहेब म्हणाले की, आजकालच्या परिस्थितीत तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि ते जर थांबवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलच पाहिजे. झाडाविषयी अधिक माहिती देतांना देवरे साहेब म्हणाले की, झाड म्हणजे श्वास,जीवन व सावली आहे.आणि कोणत्या ठिकाणी कोणते झाड लावावे. याचे ही निकष असुन, दि जैन महासमितीने योग्य ठिकाण व झाडाची योग्य निवड केल्याबद्दल महासमितीचे कैलास देवरे यांनी कौतुकही केले.
श्री महावीर ब्रम्हचर्याश्रम येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी कैलास देवरे , नगर परिषदेचे वृक्ष प्रेमी असलेले मुख्याधिकारी महेश वाघमोडे, श्री महावीर ब्रम्हचर्याश्रम ट्रस्टी राजाभाऊ डोणगावकर,
दि जैन महासमितीचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष सुनीलजी पेंढारी जैन , प्रदेश महामंत्री प्रशांतजी मानेकर जैन , प्रदेश कोषाध्यक्ष
महेंद्रजी जैन वाडीवाले , यात्रा प्रमुख देवेंद्र आग्रेकर, विदर्भ प्रमुख अभिनंदनजी पेंढारी ,प्रदेश उपाध्यक्ष आशुतोष जोहरापुरकर , श्री.महावीर ब्रम्हचर्याश्रम चे सहसचिव परिमल रुईवाले, गो ग्रीन फाउंडेशन चे गिरीश जिचकार उपस्थित होते. कारंजा वनपरिक्षेत्राचे अधिकारी गिरीश जतकर यांचे ही यावेळेस मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला गो ग्रीन फाउंडेशनचे डाॅ पद्माकर मिसाळ, प्रविण जोशी, महेंद्र धनस्कर, परमेश्वर व्यवहारे, प्रज्वल गुलालकरी, प्रकाश सरोदे, अमोल काळे, संजीवभाऊ रुईवाले, पियुष डोणगावकर, निनाद जिंतुरकर, पवन उखळकर, प्रजय गहाणकरी, सुदीप मिश्रीकोटकर, प्रफुल आग्रेकर, मंदार जोहरापुरकर, अनुप नांदगावकर ,श्रीराम धर्माधिकारी व सारंग देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन व आभारप्रदर्शन चिंतामण बुस सर यांनी केले.तर दि जैन महासमितीचे कारंजा संभाग चे अध्यक्ष ॲड संदेश जिंतुरकर,सचिव कविश गहाणकरी ,प्रदेश सदस्य नितीन बुरसे, सुहासभाऊ चवरे ,रितेश मिश्रीकोटकर, राहुल कानडे , रणजित वाकळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
आपल्या प्रतिक्रिया द्या....