येथील ने. हि. महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने 21 जून 2022 ला आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्त्याने आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्रमुख उपस्थिती सौं रिता उराडे नगराध्यक्षा नगर परिषद, ब्रम्हपुरी तर प्रमुख अतिथी म्हणून मा अतुल देशकर माजी आमदार, ब्रम्हपुरी विधानसभा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, डॉ. एस. एम. शेकोकर, डॉ. प्रकाश वट्टी, डॉ. के. एम. शर्मा, अभिजित परकरवार, श्री. भगवान पालकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाले व शासकीय नियमानुसार श्री. पालकर या मार्गदर्शनानुसार योगासन घेण्यात आले.
डॉ. एन. एस. कोकोडे यांनी योगासनाचे महत्त्व पटवून दिले.
सौं रिता उराडे यांनी योग हा भारतीय संस्कृतीचा घटक आहे असे प्रतिपादित केले.
मा. अतुल देशकर यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तर योगाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे या करिता डॉ. डी. एच. गहाणे शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, NSS, NCC विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. एस. एम. शेकोकर, डॉ. के. एम. शर्मा. श्री. संजु मेश्राम, श्री. विकास पाटील यांनी केले.