यवतमाळ :-
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांतातील निवडक कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग यवतमाळ नजीकच्या दीनदयाळ प्रबोधिनीत येत्या 27,28,29 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला असून त्यासाठी विदर्भातील अकरा ही जिल्ह्यातील 250 पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक व अभ्यास वर्ग व्यवस्था प्रमुख हितेश सेठ यांनी दिली आहे.
अभ्यास वर्गाचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे , मा.आमदार मदनभाऊ येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या अभ्यास वर्गासाठी प्रामुख्याने ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस,सचिव अरुण देशपांडे, राष्ट्रीय सहसचिव जयंती भाई कठीरिया ,पाश्चिम क्षेत्र संघटक गजानन पांडे, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, सचिव नितीन काकडे, संघटक डॉ अजय गाडे हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन करतील. सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019, महावितरण, बांधकाम कायद्यातील तरतुदी, कृषी ग्राहक, कार्यकर्ता, ग्राहक पंचायतीच्या कार्यात महिलांचा सहभाग इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर पुणे जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अजय भोसरेकर,महावितरणच्या सल्लागार व ग्राहक पंचायत च्या माजी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. गौरी चांद्रायन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी क्षेत्रीय प्रचारक रविन्द्र भुसारी, जळगावचे वैद्यकीय ग्राहक हक्क जाणकार विजय मोहरीर उपस्थित राहून ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करतील. याशिवाय वैद्यकीय ग्राहकांसाठी एका विशेष चर्चासत्राचे आयोजन सुद्धा या अभ्यास वर्गात करण्यात येणार असून प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.अजित फडके, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. दिलीप देशमुख,डॉ. प्रशांत कसारे,डॉ. गिरीश माने,डॉ. विनायक कुलकर्णी, डॉ. संजीव जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्ती या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
निळोना धरणा लगतच्या निसर्गरम्य परिसरात होणार्या या प्रांत अभ्यास वर्गाच्या यशस्वितेसाठी ग्राहक पंचायतीचे जेष्ठ कार्यकर्ते अनंत भिसे ॲड. राजेश पोहरे,डॉ.शेखर बंड,राजेंद्र कठाळे, चंद्रकांत गड्डमवार,प्रकाश चणेवार, विपुल पोबारू,
राधामल जाधवानी,जिनेंद्र बंगाले, डॉ. कैलाश वर्मा,डॉ. केशव चेटूले,प्रा.मतीन खान,प्रा.सुरेश ढोके,प्रा.राजेंद्र ठाकूर,अशोक फाळके याच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....