कारंजा (लाड) : दि. 18 नोहेंबर 2023 रोजी,स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना आणि साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार कारंजाच्या विद्यमाने,स्थानिक जगत्जननी जगदंबा मंदिर, इन्नानी जिन कारंजा येथे,डॉ इम्तियाज लुलानिया आणि रोमिल लाठीया यांनी स्थापन केलेल्या,ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट कारंजा द्वारा निमित्त "जय हो स्वच्छ भारत" ह्या राष्ट्रिय कार्यक्रमावर आधारीत लघुचित्रपटाचे निर्माते, करावते गायक तथा विविधांगी समाजोपयोगी उपक्रमात सदैव सहभाग देणाऱ्या, रोमिल अरविंद लाठीया यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ कॉग्रेस कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रदिपजी वानखडे, काँग्रेस सेवादलाचे जिल्हासमन्वयक युवा नेते अँड संदेश जिंतुरकर, करंजमहात्म्य परिवाराचे प्रमुख उमेश अनासाने,कैलास हांडे, देविदास नांदेकर,ईरो फिल्मसचे डॉ इम्तियाज लुलनिया,रामदासजी कांबळे, संजय कडोळे इत्यादी उपस्थित होते.यावेळी रोमिल लाठीया यांचा पुष्पगुच्छ देवून सकार करण्यात येवून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्यान.तसेच निसर्गोपचार दिना निमित्त निसर्गोपचार तज्ञ डॉ. इम्तियाज लुलनिया यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात अँड संदेश जिंतुरकर,प्रदिप वानखडे , डॉ इम्तियाज लुलनिया यांनी रोमिल लाठीया यांच्या विधायक कार्याविषयी माहिती दिली.संजय कडोळे यांनी, "पिढीजात समाजसेवेचे व्रत घेतलेल्या लाठीया परिवारातील रोमिल लाठीया यांचे व्यसनमुक्ती समाज कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगीतले." तर अँड.संदेश जिंतुरकर यांनी रोमिल लाठीया यांनी समाजकार्या सोबतच राजकिय क्षेत्रात पाऊल ठेवून आगामी नगर परिषद निवडणूकीत सहभाग घेण्याविषयी सुचवून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. रोमिल लाठीया यांनी आपल्या मनोगतातून सर्वाचे प्रेम मिळत असल्वाचे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले.डॉ इम्तियाज लुलनिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.