घुग्घुस : वर्धा नदीच्या मूंगोली पुलावरून काल रात्री कोलश्याचा रिकामा ट्रॅक पडला यात चालक वॉर्ड क्रमांक 01 निवासी भारत टेकाम वय 40 वर्ष यांचा अत्यंत दुर्दैवी रित्या मृत्यू झाला. शव काढण्या करिता पेलोडर व डोजरच्या साहाय्याने नदी पर्यंत रस्ता बनवून क्रेनच्या माध्यमातून ट्रॅक बाहेर काढण्यात आले. शव बाहेर काढण्याच्या कामात काँग्रेस नेते रोशन पचारें व टीमने अथक परिश्रम घेतले.
घटनास्थळी घुग्गुस पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे हे पोलीस ताफ्या सह पोहचले शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा नियंत्रण प्थकाला ही पाचारण करण्यात आले. आठ ते दहा तासाच्या अथक परिश्रमा नंतर शव बाहेर काढण्यात यश आले.
घटनास्थळी सकाळ पासूनच काँग्रेस पक्षाचे रजुरेडी, सैय्यद अनवर, इर्शाद कुरेशी, दीपक पेन्दोर भाजप अध्यक्ष विवेक बोढे उपस्थित होते. यापुलावरून यापूर्वी ही अनेक वाहने नदीत पडली मात्र पहिल्यांदा जीव हानी झाली आहे. पुलाची स्तिथी ही अत्यंत जर्जर असून जागो - जागी पडलेले खड्डे हे अपघाताला कारणीभूत होत असून वेकोलीने हे खड्डे तातडीने भरावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली आहे.