आष्टी- मा.गोपालजी मुंदडा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या योग नृत्य परिवार शाखा आष्टी च्यावतीने आष्टी परिसरातील जनतेमध्ये हर घर तिरंगा विषयी जाणीव जागृती व्हावी .याकरिता भव्य रॅली काढण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणातून प्रारंभ झालेली रॕली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पोहचून हर घर तिरंगा घरघर तिरंगा चा नारा दिला .तसेच फीट इंडिया हीट इंडिया ,करे योग रहे निरोगचा संदेश दिला.सदर रॅली ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथे आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. कुंदनजी गावडे ,मा.जनबंधू,श्री. मस्के तथा अन्य सहकारी उपस्थित होते .यावेळी सौ.ममता साव या ज्येष्ठ महिलेच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर हर घर तिरंगा, घरघर तिरंगा हा संदेश समाजासमोर देण्यात आला. प्रसंगी सर्वांग परिपूर्ण आणि शरीरास आवश्यक असलेल्या योग नृत्याचे सादरीकरणही करण्यात आले .यावेळी सपना दीपक पांडे ,पौर्णिमा विजय पांडे,प्रीती पंकज आलूरवार,पिंकीं मानापुरे,प्रा.सचिन सहारे,डाॕ.राजकुमार मुसणे , प्रा.रवी गजभिये ,प्रा.नारायण सालूरकर,डाॕ.कलकोटवार,कविता पोलोजी,रवी आगरकर,श्री.बांगरे,श्री.नगरगोजे,मंजुषा राजू बर्लावार, सौ.राठोड,श्री. बेलकीवार,सोनल बोनगीरवार,स्वाती गौरकर,प्रतिभा पेचे,सारिका झाडे,रजनी बावणे,वंदनाडाखोरे, सुरेखा कुकुडकर,श्री.देठे,नितीन,राजू तुंबडे , सरकार सर,व्यंकटेश कुंदोजवार व महात्मा जोतीबा फुले महाविद्यालय आष्टी येथील रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.