बल्लारपूर - गणेशोत्सव व आगामी काळात येणारे ईद, नवरात्र सण बघता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बल्लारपूर येथील 3 गुन्हेगारांना हद्दपार केले आहे.
अनेक दिवसापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश आणण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज आहे, मात्र उत्सव व सणासुदीचा काळ भयमुक्त रहावा यासाठी पोलीस अधीक्षकांनी तीन अट्टल गुन्हेगारांना 1 वर्षासाठी हद्दपार केले आहे.
यामध्ये बामणी येथील 43 वर्षीय चेतन मनोहर खुटेमाटे, 32 वर्षीय राकेश लक्ष्मण देरकर व 52 वर्षीय किशोर गुलाब मुडपल्लीवार यांचा समावेश आहे, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
ते टोळीने दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात.
तिघांना हद्दपार करण्यासाठी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.
पोलीस अधीक्षक यांनी कलम 55 अनव्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तिघांना वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले असून यापुढे जिल्ह्यातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर अशीच कारवाई करण्यात येणार आहे.