वाशिम/कारंजा : वत्सगुल्म महात्म्य या प्राचिन धार्मिक ग्रंथानुसार वाशिम शहराचे ऐतिहासिक, प्राचिन असलेले आराध्य दैवत चामुंडा देवीचे संस्थान हे रामायण काळातील असून श्री चामुंडा देवी संस्थानच्या शारदिय नवरात्रोत्सवानिमित्ताने आज शुक्रवार दि १४ ऑक्टोंबर रोजी येथे भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख पुजारी असलेल्या वानखडे कुटूंबाने, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती वरून, रइतिहास काळात हजारो वर्षापूर्वी वाशिमच्या देवतलावामध्ये १) श्रीमंत बालासाहेब ( बालाजी ), २) श्री चामुण्डा देवी व ३ ) श्री नाल साहेबांची अशा तीन मुर्त्या मिळाल्या होत्या . राजे वाकाटक यांच्या काळापूर्वी या तीन्ही देवतांची वाशिम येथे मंदिरे बाधून संस्थान झाली . श्री चामुण्डा देवी मंदिरात शारदिय श्री नवरात्रोत्सवात फार मोठा नवरात्रोत्सव संपन्न होतो . विशेष म्हणजे नवरात्रोत्सव आणि महाप्रसादाला संपूर्ण विदर्भ - मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह देश विदेशातुन येथे मातृशक्तिउपासक येत असतात. चैत्र नवरात्रोत्सवात येथे किरणोत्सव साजरा केला जातो . बहिन श्री चामुंडा देवीचे बंधुराज श्री बालासाहेब ( बालाजा संस्थान ) यांचेकडून येथे साडीचोळीचा आहेर आणि पालखी नेण्यात येत असते. अतिशय प्राचिन श्री चामुंडा देवी मंदिरात श्री गणेश मंदिर, हनुमान मंदिर, शनि मंदिर, आसरामाता मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, संत गजानन महाराज मंदिर सुद्धा असून बाहेर ऐतिहासिक बारव सुद्धा आहे . या बारव मध्ये पितृदोष असल्यास दर्पण विधी केला जातो त्यामुळे पितरांना मोक्ष मिळून पितृदोष नाहीसा होत असल्याची श्रध्दा आहे . सदरहु मंदिराचे परिसरात वानखडे परिवार वास्तव्यास असून तेच या मंदिराचे पुजारी असून येथील कारभार पहातात . आज येथे ५१ क्विंटल गहू, ४१ किलो काशीफळ, ३१ डबे तेल, २१ क्विंटल तांदूळ, अकरा क्विंटल बुंदीचा प्रसाद असून सध्या महाआरतीनंतर महाप्रसादाला प्रारंभ झालेला असून उशीरा रात्री पर्यंत भोजनाचा कार्यक्रम सुरु राहणार असल्यामुळे जास्तित जास्त मातृउपासकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याची व जेवणावळी वाढण्याकरीता श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे .