कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम शहा येथील जिल्हा परिषद प्राथ शाळा येथे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असलेल्या,सौ.संगीताताई धोटे (भिंगारे) यांना जिल्हा परिषद वाशिम प्रशासनाने,शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर बढती देऊन,मानोरा पंचायत समिती येथील शिक्षण विभागात त्यांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या चाहत्या मैत्रीणींमध्ये आनंदाचे वातावरण असून,मैत्रीणींकडून आणि विविध संस्थाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून, कारंजा येथील समीक्षा गृह उद्योग समुहाकडून,शुक्रवारी दि 7 जुलै रोजी सायंकाळी 06:00 वाजता स्थानिक वनदेवी नगर येथे,एका छोटेखानी कार्यक्रमात,सौ संगीताताई भिंगारे यांचा सत्कार घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.छायाताई गावंडे ह्या होत्या.तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून करंजमहात्म्य परिवाराचे संजय कडोळे,उमेश अनासाने होते.यावेळी सर्वप्रथम सौ. छायाताई गावंडे यांनी, समिक्षा गृह उद्योग समूहाकडून करण्यात येणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली.तसेच सदर्हू लघुउद्योगाच्या विकासाकरीता मैत्रीणी आणि विशेषकरून सौ संगीताताई धोटे यांचे विशेष मार्गदर्शन मिळत असल्याचे सुद्धा नमुद करीत,आमच्या मार्गदर्शिका यांना जि.प.प्रशासनाने बढती दिल्याचा आम्हाला आनंद झाला असल्याचे सांगीतले. यावेळी प्रमुख पाहूणे संजय कडोळे, उमेश अनासाने,सौ रजनीताई ताकतोडे, सौ.वंदनाताई लुंगे सौ छायाताई गावंडे यांचे हस्ते सौ संगीताताई धोटे यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराला प्रत्युत्तर देतांना सौ.संगीताताई धोटे यांनी आपण आपल्या सेवाकाळात,गोरगरीब शेतकरी व शेतमजुरांची मुले शिक्षणा पासून वंचित असू नये.याकरीता जी धडपड केली. व विद्यादानाचे पवित्र कार्य केले.त्याचे फलित म्हणून मला बढती मिळाली असून,मी सदैव जिल्हा परिषद शाळा वाचविण्याकरीता आणि उत्तम रित्या चालविण्या करीता प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.