अकोला...स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, रोटरी क्लब अकोला ईस्ट, व शिवाजी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात अंध बांधवांसाठी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन 1एप्रिल2022 रोजी करण्यात आले होते. शिवाजी महाविद्यालयाच्या ब्रेल ग्रंथालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब अकोला ईस्ट च्या अध्यक्षा सौ. भारती शेंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.ओमकार गांगडे, मयूर सिंघानिया, रमण राठी, विजय जानी, डॉ. खडसे, विशाल तडस, श्री.राम शेगोकर, स्वप्नाली जहागीरदार, रेणुका तायडे उपस्थित होते. दिव्यांग शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी ह्या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ईस्ट अकोला तर्फे अकोला जिल्ह्यातील अंध बांधवांना पांढऱ्या काठ्याचे वाटप करण्यात आले. श्री. ओमकार गांगडे, सौ. मंदा रुखने द्वारा दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या प्रशिक्षण कार्यशाळेस आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमात मंजिरी पांडे या अंध विद्यार्थिनीने संगीतमय प्रस्तुती दिली. सौ.भारती शेंडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन ला समाजाने भरभरून सहकार्य करावे असे आव्हान केले. प्रसन्न तापी, नितीन खंडारे, मंजुषा खाडे, रोहित सुर्यवंशी, व जिकरिया अली ह्या अंध विद्यार्थ्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहकार्याबाबत मनोगत व्यक्त केले. अंध क्रीडापटू चैतन्य पाठक ह्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव अक्षय राऊत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.प्रसाद झाडे, विशाल भोजने, अनामिका देशपांडे, श्री.विवेक तापी, धनश्री पांडे व श्री.विजय पाठक यांनी सहकार्य केले.