वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : स्टॅन्ड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी केंद्र शासनाने तरतूद उपलब्ध केली आहे. सदर रक्कम SIDBI (Small Industries Development Bank of India) सिडबीकडे वर्ग केली आहे. सिडबीने या रकमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले आहे. लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाईल त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील महिलांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front End Subsidy १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे