
कारंजा (लाड) मॉं जिजाऊ फाउंडेशन संस्था (रजि) शिरपूर जैन यांच्या वतीने,कारंजा (लाड) येथील "नि:स्वार्थी लोककलावंत, निर्भिड व ज्येष्ठ पत्रकार आणि हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असलेले दिव्यांग जनसेवक संजय कडोळे" यांना इ.सन 2023-24 चा राज्यस्तरिय "आदर्श नेता राजरत्न पुरस्कार देऊन आणि "लोककलावंत तथा साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे सहसंपादक उमेश अनासाने" यांना राज्यस्तरिय "आदर्श कलारत्न पुरस्कार" देऊन संस्थापक अध्यक्ष- भारत यादवराव भालेराव,उपाध्यक्ष - निखिल चक्रनारायण, सचिव-ज्ञानेश्वर पवार,यांच्या वतीने, प्रजासत्ताक दिनाचे पूर्वसंध्येला कारंजा येथे झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,राष्ट्रिय काँग्रेसचे निस्सिम ज्येष्ठ नेते तथा कारंजा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंदजी लाठीया, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य (शिवसेना) दत्ताभाऊ तुरक पाटील, शिवसेना शहर अध्यक्ष गणेशराव बाबरे,सेवादल कॉग्रेसचे राजिक शेख, माजी सरपंच प्रदिप वानखडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष हाजी रऊफ खान, सेवादल कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राजुभाऊ लाहोटी,जिल्हा सेवादल कॉग्रेसचे समन्वयक ॲड संदेश जिंतुरकर, इत्यादीचे प्रमुख उपस्थितीत या मान्यवरांचे हस्ते, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत,ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना राज्यस्तरिय "आदर्श नेता राजरत्न पुरस्कार" देऊन आणि पत्रकार उमेश अनासाने यांना "आदर्श कलारत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.

त्याबद्दल त्यांचे भ्रमण ध्वनिवरून आमदार अमित झनक, मालेगाव रिसोडचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक, जिल्हा सेवादल काँग्रेसचे डॉ विशाल सोमटकर, मॉ जिजाऊ फाऊण्डेशन शिरपूर संस्थेचे कोषाध्यक्ष-रवीकुमार गाढवे,सदस्य-राहुल बोबडे,
शिवप्रसाद ढेंगळे, ओमकार गावंडे, गोपाल धोंगडे,
,शुभम मस्के, राजू बोबडे, नारायण टेकाळे इत्यांदींनी अभिनंदन केले असून आपल्या अध्यक्षिय संभाषणातून बोलतांना अरविंद लाठीया म्हणाले की,संजय कडोळे हे स्वतः बेघर,निराधार, आर्थिक परिस्थितीने कमकुवत असतांनाही गेल्या चाळीस वर्षापासून नि:स्वार्थ समाजसेवेत अविरतपणे कार्य करीत असून मी त्यांना जवळून पहात आहे. आज मॉ जिजाऊ फाऊण्डेशन यांनी त्यांचा आणि पत्रकार उमेश अनासाने यांचा केलेला गौरव आम्हा कारंजा वासियांकरीता स्वाभिमानाची सुखद घटना आहे." यावेळी कार्यक्रमाचे आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रऊफ मामू यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....