कारंजा : आपल्या कर्मठ व विश्वासार्ह भूमिकेने समाजाच्या विकासाकरीता प्रामाणिकतेने जीवन समर्पित करणाऱ्या,विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके हे ओळखले जायचे.त्यांनी आयुष्यभर,समाजाच्या व मतदारसंघाच्या हिताचे व विकासाचे निर्णय घेतले.त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकीत पुढे चालून,त्यांच्या सुविद्य अर्ध्यांगीनी ताईसाहेब-सईताई डहाके ह्या सभोवतालच्या गोरगरीब,तळागाळातील,बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय घेत असतात.त्यामुळे त्यांनी कारंजा येथील सरस्वती भवन मध्ये झालेल्या कलावंत मेळाव्यात,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या मध्यवर्ती कार्यकारिणी करीता होणाऱ्या,नियामक मंडळाच्या निवडणूकीच्या निमित्ताने निर्णय घेऊन,बहुजन समाजाचे, चारित्र्यवान व नि:स्वार्थी आणि नाट्य कलावंताच्या हिताचे निर्णय घेणारे उमेद्वार नाट्य परिषदे करीता लाभल्याने स्वतः सर्वोतोपरी निर्णय घेऊन वाशिम जिल्ह्यात व कारंजा तालुक्यात नाट्य कलावंता करीता कार्य करण्यास सर्वदृष्टिने सक्षम असलेले,(मतदान पत्रिकेवरील) प्रथम क्रमांकाचे उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळकर,कारंजा [लाड] आणि चतुर्थ क्रमांकाचे उमेद्वार उज्वल दत्तात्रय देशमुख यांना आपला पाठींबा जाहीर करून त्यांच्या यशस्वी प्रचाराची मोहीम सुरू केली आहे.या संदर्भात अधिक वृत्त असे की,शुक्रवार रोजी कारंजा येथे नाट्य कलावंताचा भव्य मेळावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या कलावंत मेळाव्याचे अध्यक्षस्थानी ताईसाहेब,सईताई प्रकाशराव डहाके ह्या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून वाशिम नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री मिठुलाल शर्मा हे होते.कार्यक्रमाला नाट्य परिषदेचे माध्यमातून कलावंताचे निःस्वार्थ हित पहाणारे उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख हे उपस्थित होते.सदरहू मेळाव्याला कारंजा तालुक्यातील कलावंतासह मानोरा,मुर्तिजापूर, मालेगाव,वाशिम येथील कलावंताची उपस्थिती होती. पुरुष कलावंतासह बहुतांश महिला मंडळीचा उत्साह भरभरून दिसून येत होता.यावेळी निवडणूकीतिल उमेद्वार नंदकिशोर कव्हळकर यांनी विनम्रतेने कलावंत मतदारांकडे मताचा जोगवा मागतांना म्हटले की, "गेल्या पंचवार्षिक मध्ये कोव्हिड १९ कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे अख्खे जगच ठप्प झालेले होते. संचारबंदी मुळे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे सुद्धा सर्वच कार्यक्रम बंद होते. त्यामुळे नाट्य परिषदेला सुद्धा काहीच विकास कामे करता आलेली नाहीत. परंतु येणारा भविष्यकाळ आपल्या करीता चांगला असून, मिळालेल्या संधीचे सोने करीत मी नंदकिशोर अंबादास कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख आम्ही दोघेही उमेद्वार कारंजा - मानोरा येथे नाट्य सभागृहाची निर्मिती करूनच दाखवू. तसेच शासन स्तरावरुन जिल्ह्यातील नाट्यकलावंताचे सर्व प्रश्न,सर्व समस्या निश्चितच सोडवू.नाट्य कलावंताना कागदपत्राकरीता एक रुपया सुद्धा खर्च न येऊ देता,त्यांना दरमहा मानधन मिळवून देऊनच मोकळा श्वास घेऊ."असे स्पष्ट केले आहे. उज्वल देशमुख यांनी सुध्दा कलावंता करीता नि:स्वार्थपणे कार्य करून नाट्य कलावंताच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.असे स्पष्ट केले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना ताईसाहेब सईताई डहाके म्हणाल्या, "बहुजन समाजाच्या हिताच्या निर्णयाच्या दृष्टिने व नाट्यक्षेत्राचा,नाट्य कलावंताचा विकास करून त्यांना मानधन मिळवून देण्याकरीता,कारंजा मानोरा येथील नाट्य सभागृहाकरीता,नाट्य कलावंतानी आपले अमूल्य मत नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख यांनाच देऊन निवडून द्यावे." तसेच यशस्वी झालेल्या कलावंत मेळाव्याबद्दल बोलतांना त्या पुढे म्हणाला की, " कलाकार आपल्या कलेद्वारे समाज प्रबोधन करीत असतो.बहुजन समाजाला एकत्र जोडण्याकरीता अशा लहान मोठ्या कलावंत मेळाव्याची व स्नेहभोजनाची अत्यंत गरज आहे." स्नेहभोजन म्हणजे अन्न हे परब्रम्ह असून स्नेहभोजनामुळे स्नेह व आपुलकी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .