कारंजा : अमरावती कारंजामार्गे वाशिम मार्गावरील वाशिम येथील पुसद चौकातून वाशिम -पुसद मार्गावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलावरील काही किरकोळ कामे वेगाने सुरू आहेत.ही कामे पूर्ण होताच येत्या काही दिवसात लवकरच या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येईल.अशी माहिती पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला आज वाशीम कार्यालयात मिळाली असून .त्यामुळे लवकरच या उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू होणार असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना,प्रवाशांना व नागरिकांना दिलासा मिळणार असून यापुढे रेल्वे काँसिंग वर थांबावे लागणार नसल्याने लवकरच प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .