ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्रातील सर्व नागरीकांना तसेच विविध सामाजिक संघटना यांना कळविण्यात येते की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समिती , ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका , नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास ( ओबीसों , व्हीजे एनटी ) आरक्षण देण्यासाठी मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केलेला आहे . महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरीकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदन स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केलेला आहे . सदर कार्यक्रमामध्ये नागपूर विभागाकरीता दिनांक 28 मे 2022 रोज सायंकाळी 4.30 ते 6.30 हा कालावधी निश्चीत करण्यात आलेला आहे . त्या अनुषंगाने या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरीकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी नोंदणी करण्याकरीता मा . जिल्हाधिकारी कार्यालय , चंद्रपुर ( निवडणूक विभाग ) येथे सहाय्यता कक्ष तयार करण्यात आलेला आहे . करीता ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्रातील नागरीकांच्या तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या काही तक्रारी असल्यास मा . जिल्हाधिकारी कार्यालय , चंद्रपुर ( निवडणुक विभाग ) येथे सहाय्यता कक्ष या कार्यालयात आपले तक्रारी लेखी स्वरुपात नोंदवाव्या . असे आवाहन करण्यात येत आहे .